महारेशीम अभियान जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रचार रथास हिरवी झेंडी तुती लागवडीसाठी शेतक-यांना नाव नोंदविण्याचे आवाहन


           
            अकोला,दि.13 (जिमाका) -   रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी  तुती लागवडीकरीता लाभार्थ्यांची नाव    नोंदणी   करण्यासाठी  मंगळवार  दि. 21  जानेवारी 2020 पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येत  आहे.  पात्र   शेतकऱ्यांना एक  एकर तुती   लागवडी   करीता  500 रुपये नोंदणी  फी   भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असुन   शेतक-यांनी सहभाग              नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
            महा रेशीम अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते रेशीम उद्योगाबाबत माहिती देणाऱ्या चित्ररथास जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे हिरवा झेंडी दाखवून  शुभारंभ करण्यात आला.              यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अरविंद मोरे,           प्रकल्प  अधिकारी  विजय ठाकरे,  क्षेत्र सहायक सुनिल  मानकर, अनिल   सुळकर, ललित  येवले. शिला कविटकर,   कार्यालयीन   कर्मचारी  प्रमोद  मसने, अभिजित   वंजारे, स्वाती   बोंडे, संतोष     आगरकर, सतिश निंबोकार , तांत्रिक कर्मचारी,    जिल्हा   रेशीम कार्यालयामार्फत निवड केलेले शेतकरी उपस्थित होते.
            रेशीम उद्योग हा शेती वर आधारीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वत:च्या शेतीवर कामकाज करुन त्या शेतात केलेल्या कामकाजाचा रोजंदारी मेहनताना शासनाकडून मनरेगाच्या नियमानूसार साप्ताहिक मजुरी तीन वर्षाकरीता दिली जाते. हे कामकाज शासनाने ठरवून दिलेल्या मनरेगाच्या निकषानूसार परिपुर्ण करणे गरजेचे आहे. यामध्ये रेशीम शेतीच्या माध्यमातुन उत्पादित होणा-या कोषापासून होणारे उत्पन्न त्या लाभार्थ्यांस  दुहेरी लाभ दिला जातो. म्हणजे स्वतःच्या शेतामध्येच कामकाज करुन शासनाच्या वतीने रेशीम शेतीशी निगडीत केलेल्या कामकाजाची मजुरी नियमित अदा केली जाते. लाभार्थ्यांस शासन नियमानुसार तीन वर्षाकरीता साप्ताहिक मजुरी 682 दिवस व 213 दिवस किटक संगोपनगृह बांधकामाच्या कालावधी मध्ये मजुरी अदा केली जाणार आहे. तसेच रेशीम पिकासाठी लागणारे संगोपन गृहासाठी कुशल खर्च 1 लाख 10 हजार 680 रुपये नियमानुसार दिला जाणार आहे. या करीता जादा लागणारा खर्च लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थीस स्वतः करावा लागणार आहे.
            रेशीम उद्योग योजनेमध्ये मनरेगा अंतर्गत पहिल्या वर्षी मजुरी अकुशल 1 लाख 1 हजार 970 रुपये,
सामुग्री अकुशल 81 हजार 210 रुपये  असे एकूण 1  लाख 83 हजार 180 रुपये. दुस-या वर्षी मजुरी अकुशल 41 हजार 200 रुपये, सामुग्री अकुशल 19 हजार 285 रुपये असे एकूण 60 हजार 485 रुपये ,तिसऱ्या वर्षी मजुरी अकुशल 41 हजार 200 रुपये, सामुग्री अकुशल 10 हजार 285 रुपये असे एकूण 51 हजार 485 रुपये, याप्रमाणे तीन वर्षात मजुरी अकुशल 1 लाख 84 हजार 370 रुपये, सामुग्री अकुशल 1 लाख 10 हजार 780 रुपये असे एकूण 2 लाख 95 हजार 150 रुपये शासकीय अनुदानाचा लाभ आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
                                                                 00000




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ