31 मार्च पुर्वी शंभर टक्के महसुल वसुली करा -विभागीय आयुक्त पियुषसिंह यांचे निर्देश





        अकोला,दि.31 (जिमाका)- शासकीय कर ,उपकर , थकबाकी , मनपा, भुखंडे विक्री, जमीन मोजणी , अवैध अकृषक, महसुली  दंड,   सिलींग जमिन व इतर संकीर्ण महसुल वसुलीचे उदिष्ट 31 मार्च पुर्वी  शंभर टक्के  पुर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी महसुल अधिका-यांना दिलेत.
जिल्हाधिकारी  यांच्या दालनात विभागीय आयुक्त पियुषसिंह यांच्या उपस्थितीत महसुल  वसुलीचा आढावा  व नियोजन बाबत बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी   जितेंद्र पापळकर , अतिरिक्त  जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी निलेश अपार,  रामदास सिद्धभट्टी, रमेश पवार,  जिल्हा खनिकर्म  अधिकारी अतुल दोड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे तसेच तहसिलदार व संबंधीत विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिव थाळी योजना, अवकाळी पावसामुळे नुकसान अनुदान  वाटप , पांदण रस्ते, सात-बारा  संगणीकीकरण तसेच मतदार नोंदणी नियोजन याबाबत आढावा  पियुषसिंह यांनी घेतला.
                                                         00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम