कौशल्याच्या माध्यमातुन रोजगाराच्या संधी प्राप्त करा - पालकमंत्री ना.बच्चू कडू


              अकोला,दि.15 (जिमाका)-   कौशल्याच्या माध्यमातुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात यासंधीचा लाभ घेऊन युवकांनी  आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
                     ग्रामीण भागातील युवक/युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी अधिकार कौशल्याचा,’ 'या उपक्रमातंर्गत कौशल्य नोंदणी  अभियान आगरकर विद्यालयात  राबविण्यात आले.  त्यावेळी मार्गदर्शन करतांना  ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष प्रसाद , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक डॉ. मिश्रा , जसनागरा  उद्योगाचे  समरजित जसनागरा  यांची प्रमुख उपस्थिती होती.
                     ना. कडु पुढे म्हणाले की, ज्या कौशल्याला समाजात महत्व आहे. ते कौशल्य आत्मसात करा, शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग  स्वयंरोजगार, कृषिक्षेत्र इ. क्षेत्रात उपयोग करून स्वयंनिर्भर बना, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी, शासनातर्फे ग्रामीण युवकांना विदेशात नोकरीसाठी पासपोर्ट , व्हिसाकरीता आर्थ‍िक मदत देण्यात येते  त्या सपनोंकी  उडान या योजने अंतर्गत  प्रायोगिक तत्वावर  पासपोर्टचे वितरण युवक/युवतींना करण्यात आले.  या नोंदणी  अभियांनात  बाराशे युवक/युवतींनी  भेट देऊन  नोंदणी केली.
                     जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  जास्तीत जास्त युवकांनी  विविध रोजगाराच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी, असे आवाहन केले.  तर उपस्थितांचे आभार  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष प्रसाद यांनी  मानले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ