जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ; मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी


अकोला,दि.2 (जिमाका)-  जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदार संघाची सार्वत्रिक निवडणुक  दि. 07 जानेवारी 2020 रोजी  होणार आहे. अकोला जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदार क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा क्षेत्रातील  दुकाने, निवासी हॉटेल , खाद्यगृह, नाट्यगृह, अन्य गृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार /अधिकारी/ कर्मचारी यांना मग ते कामानिमीत्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
तसेच, दि 07 जानेवारी 2020 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राच्या सार्वत्रीक निवडणूका , 2020  होत असल्याने त्या त्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघ क्षेत्रामध्ये, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापना वगळून , सर्व आस्थापना सकाळी 7:00 ते संध्याकाळी  6:00 या वेळात बंद ठेवण्यात याव्यात.  त्या दिवशी बंद राहिलेल्या दुकाने/आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येवू नये.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधीत जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.
शासन निर्णयाचे पालन न केल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अकोला येथे मतदानाच्या कालवधीत दक्षता कक्ष स्थापन करण्यात आलेला, असुन अनुषंगीक बाबतीत काही तक्रार असल्यास संबंधीत कामगारांनी संपर्क साधावा.  असे सहाय्यक कामगार आयुक्त,अकोला यांनी आवाहन आहे.                00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ