पंचायत समिती सभापती पदाकरीता आरक्षण सोडत









अकोला,दि.13 (जिमाका)-    अकोला जिल्हा परिषद त्याअंतर्गत पंचायत समित्यांचे सभापती  पदाकरीता आरक्षण सोडत आज  छत्रपती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला  येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच  पंचायत समिती  गणातुन  निवडुन आलेले  नवनिर्वाचीत सदस्य  उपस्थित होते.
सोडती नंतर पंचायत समित्यांचे सभापती  पदाकरीता  जाहीर आरक्षण  पुढीलप्रमाणे.
पंचायत समिती अकोट – अनुसूचित जाती (महिला) , पंचायत समिती तेल्हारा– नागरीकांचा मागास प्रवर्ग  (महिला), पंचायत समिती अकोला – नागरीकांचा मागास प्रवर्ग  ,  पंचायत समिती मुर्तिजापुर -  सर्वसाधारण ,  पंचायत समिती  बाळापुर -  सर्वसाधारण (महिला),  पंचायत समिती बार्शिटाकळी – अनुसुचित जाती,  पंचायत समिती  पातुर - अनुसूचित जमाती .
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ