“ परम शावक सृष्टीचे शनिवारी उद्घाटन ”


                                  
        अकोला,दि.9 (जिमाका)-  डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला  सेंटर फॉर डेव्हलेपमेंट ऑफ ॲडव्हॉस  कॉम्प्युटींग (सि-डॅक) पुणे यांचे  संयुक्त विद्यमाने  परम शावक सृष्टी (सुपर कॉम्पुटर) चे उद्घाटन इलेक्ट्रानिक्स, माहिती तंत्रज्ञान,  दुरसंचार आणि मानव संसाधन विभागाचे केंन्द्रीय राज्य मंत्री मा. संजय धोत्रे  यांचे    हस्ते  डॉ. पंजाबराव  देशमुख  कृषि विद्यापिठात कृषि महाविद्यालयाच्या कमेटी हॉल मध्ये शनिवार, दि.11  रोजी सकाळी  11 वाजता होणार आहे.
            यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे उपकुलगुरू  डॉ. विलास भाले, सी डॅक पुणे चे  महासंचालक हेमंत दरबारी यांची प्रमुख उपस्थिती  राहणार आहे.
            यावेळी महापौर अर्चना मसने, विधान परिषदेचे सदस्य  आ.डॉ. रणजित पाटील, आ. गोपीकिशन बाजोरीया, आ. श्रीकांत देशपांडे , विधानसभा सदस्य आ.  गोवर्धन शर्मा,  आ. प्रकाश  भारसाकळे  ,आ. हरिष पिपंळे , आ. रणधिर सावरकर, आ. नितीन  देशमुख , डॉ. पंजाबराव  देशमुख कृषि विद्यापिठाच्या कार्यकारणीचे सदस्य  जैन्नुदीन जवारी, गणेश कांडरकर, स्नेहा हरडे,  विनायक सरनाईक, मोरेश्वर  वानखडे, डॉ. सी डी मायी, डॉ. पी.जी. पाटील,  डॉ. अर्चना बारब्दे  यांची  प्रमुख उपस्थिती राहणार आहे.         असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे अधिष्ठाता  डॉ. पी.जी .इंगोले, संचालक डॉ. वी. के. खर्चे, संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी कळविले आहे.
                                                                   00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ