जि.प.,पं.स. निवडणुक मतदान, मतमोजणी कालावधीत मद्यविक्री बंद


अकोला,दि.1 (जिमाका) – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी जिल्ह्यात मंगळवार दि. 7 रोजी मतदान तर बुधवार  दि. 8 रोजी मतमोजणी  होणार आहे.  या  कालावधीत  कायदा व सुव्यवस्था  अबाधित राहावी तसेच निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदानाचा अगोदरचा , मतदानाचा व मतमोजणीचा असे तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
या आदेशान्वये मतदानाचा आधीचा दिवस दि. 6 रोजी, मतदानाचा दिवस मंगळवार दि.7 व  मतमोजणीचा दिवस बुधवार दि. 8 असे तिन दिवस जिल्ह्यातील  ज्या पंचायत समिती क्षेत्रात  मतदान आहे त्या क्षेत्रातील  ज्या  तहसिल कार्यालयात मतमोजणी आहे.  त्या तहसिल कार्यालय  क्षेत्रातील मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. या आदेशाचा भंग  करणा-या विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा