पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.14 (जिमाका)-     राज्याचे जलसंपदा  व लाभक्षेत्र विकास , महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,  भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण,  कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडु  हे बुधवार दि. 15 रोजी जिल्हा दौ-यावर  येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम  याप्रमाणे.
बुधवार दि. 15 रोजी सकाळी 7 वा. मुर्तिजापुर येथे आगमन, सकाळी साडेआठ वा. राजनापुर, खिनखिनी ता. मुर्तिजापुर येथे दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकरी घरकुल भुमिपूजन,  सकाळी दहा वा. आ. गोपिकिशन बाजोरीया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सकाळी सव्वा दहा वा.  आ. नितीन देशमुख यांच्या निवासस्थानी  सदिच्छा भेट व  शिवसेना कार्यकर्ता बैठक, सकाळी पावणे अकरा वा. जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेस सदिच्छा भेट,  सकाळी  11 वा. कर्मचारी भवन  येथे दिव्यांग मेळावा, सकाळी साडे अकरा वा. आगरकर विद्यालय येथील कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वा. कार्यकर्ता मेळावा, स्थळ प्रमिलाताई ओक हॉल. दुपारी दोन वा. जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आढावा बैठक,  दुपारी चार वा. जिल्हा  परिषदेच्या छत्रपती सभागृह,  अकोला  येथे आढावा बैठक, सायं. साडेपाच वा. लोकमत कार्यालयास सदिच्छा  भेट, सायं.  सहा वा. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, सायं. सात वा. शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांशी शेतक-यांसंबंधी प्रश्नांवर चर्चा,रात्री पावणे आठ वा. अमरावतीकडे रवाना.
00000





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ