जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम; स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन 5 जानेवारी रोजी


अकोला,दि.2 (जिमाका)-  अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत रविवार दि.5 जानेवारी रोजी सायं. 5.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सेवेतील  अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचे विकास मीना (भाप्रसे), डॉ. पराग टापरे,  तसेच   अकोला      जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (भाप्रसे)व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष प्रसाद (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती असेल. तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ