कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे ५ व ६ फेब्रुवारी रोजी रोजगार भरती मेळावा



            अकोला,दि.२७(जिमाका)- शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे  बुधवार दि.५ व गुरुवार दि.६ फेब्रुवारी रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथे हा मेळावा होणार आहे. सुझुकी मोटर्स गुजरात प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन होणार आहे. या मेळाव्यात फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक, पेन्टर जनरल, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिक, टुल  ॲण्ड डायमेकर, पी पी ओ, ट्रॅक्टर मेकॅनिक, सी.ओ.ई ऑटोमोबाईल  या व्यवसायातील  आय.टी. आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना  संबंधित कंपनीमार्फत रोजगार संधी आहेत.  इच्छूक व पात्र उमेदवारांनी या मेळाव्यास  उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे भेट द्यावी असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ