मतदार दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन


अकोला,दि.17 (जिमाका)-  भारत‍ निवडणूक आयोग नवी दिल्‍ली यांचे निर्देशानूसार दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी  राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. त्‍याअनूषंगाने 18 वर्षे पुर्ण केलेल्‍या नविन तरूण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्‍यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा प्रमूख उद्देश असणार आहे.
            त्‍याअनूषंगाने दिनांक 24 जानेवारी 2020 रोजी जिल्‍हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी राष्‍ट्रीय मतदार दिनाची शपथ घेणार आहेत.
            तसेच दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय विविध शाळा,महाविदयालयाचे माध्‍यमातून रांगोळी स्‍पर्धा,वादविवाद स्‍पर्धा, वक्‍तृत्‍व स्‍पर्धा, क्‍वीझ कॉम्‍पीटिशन इ. विविध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येणार आहे. सदर स्‍पर्धांमधील विजेता व उ‍पविजेता यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्‍यात येणार आहे. तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला तर्फे अशोक वाटिका चौक ते जिल्‍हाधिकारी कार्यालय अशी मतदार जनजागृती रॅली काढण्‍यात येणार आहे. सदर रॅलीमध्‍ये विविध शाळा,महाविदयालयाचे मतदार साक्षरता क्‍लबचे पदाधिकारी व सदस्‍य, विदयार्थी, दिव्‍यांग संस्‍था,संघटना, राष्‍ट्रीय सेवा योजना,राष्‍ट्रीय कॅडेट कोअर चे विदयार्थी, महिला, जेष्‍ठ नागरीक इ. मोठया प्रमाणात सहभागी होणार आहेत.
            अकोला जिल्‍हयातील तसेच शहरातील सर्व मतदारांनी सदर रॅलीमध्‍ये मोठया प्रमाणात सहभाग नोंदविण्‍याचे आवाहन  जिल्‍हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ