राष्ट्रीय लोक अदालत 8 फेब्रूवारी रोजी



अकोला,दि.9 (जिमाका)-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा,  मुंबई यांच्या निर्देशानुसार  राष्ट्रीय  लोक न्यायालयाचे आयोजन  शनिवार, दि. 8 फेब्रूवारी रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये  सकाळी  साडेदहा  ते सायं.  साडेपाच  दरम्यान  घेणार आहे.
पक्षकारांनी आपली प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधीत न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण , अकोला (0724-2410145) यांच्याशी संपर्क साधावा आणि  राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये  सहभगी  होउन  आपले  वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष  वाय.जी. खोब्रागडे व  सचिव, स्वरूप बोस यानी आवाहन केले आहे. 
लोक न्यायालयामुळे  लोकन्यायालयाच्या निवाड्याविरूध्द अपील नसल्यामुळे  एकाच निर्णयात कोर्टबाजीतुन कायमची सुटका होते,  खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जाऊन  निकाल झटपट लागतो,लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजूतीने होत दोन्ही पक्षांना समाधान देतो , परस्पर  संमतीने निकाल होत असल्याने  एकमेकातील द्वेष वाढत नाही तसेच  कटुताही निर्माण होत नाही ,  कोर्टाच्या  हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात  होणा-या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते, वेळ आणि पैसा यांची बचत होते,  लोकन्यायालयात निकाली निघणा-या  प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते, आदि फायदे होतात.
                                                          00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ