जिल्ह्यातील 990 गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी


अकोला,दि.1 (जिमाका)- जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांकडुन खरीप पिकांचे अंतिम पैसेवारी प्रस्ताव प्राप्त झाले असुन जिल्ह्यातील 1012 गावांपैकी 990 गावांची  पैसेवारी ही पन्नास (50) पैशापेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातुन प्राप्त्‍ माहितीनुसार, जिल्ह्यातील 1012 गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या 990 गावांपैकी सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी सरासरी 45पैसे इतकी आहे.  अंतिम पैसेवारी तालुकानिहाय याप्रमाणे –अकोला-48 पैसे, अकोट- 43, तेल्हारा-49  बाळापुर- 41 , पातुर-46 , मुर्तिजापुर- 46 , बार्शिटाकळी- 45, अशी सर्व तालुक्यांची एकत्रित सरासरी पैसेवारी 45 पैसे इतकी आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ