जि.प.,पं.स. निवडणुक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर द्या- जिल्हाधिकारी पापळकर


अकोला,दि.1 (जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या  अनुषंगाने जिल्ह्यात  आदर्श  आचारसंहितेच्या  काटेकोर  अंमलबजावणीवर   भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी  जितेंद्र  पापळकर यांनी आज येथे दिले.
जिल्हा  परिषद, पंचायत समिती  निवडणूकीच्या संनियंत्रण समितीची आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ,  तसेच आयकर विभाग, पोलीस विभाग,  प्रादेशिक परिवहन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ तसेच अन्य संनियंत्रण यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
मतदान, मतमोजणी कालावधीत तैनात  करावयाचा  पोलीस बंदोबस्त, अचारसंहिता अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या  स्थिर पथके व भरारी पथकांनी  करावयाच्या  कारवाया,  निवडणुक आचारसंहिता कालावधीतील अवैध मद्यविक्री प्रतिबंधक कारवाया, शस्त्र परवाना धारकांकडुन जमा करण्यात आलेली शस्त्रे, मतदान चमुंना  ने-आण करण्यासाठी  आवश्यक बस सेवा  उपलब्धता याबाबत आढावा  घेण्यात आला. जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी पोलीस यंत्रणांनी बंदोबस्त  चोख राखावा असे निर्देशही दिले.
                                                                     00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ