रस्ता सुरक्षा सप्ताहाचा सोमवारी (दि.13) प्रारंभ


अकोला,दि.10 (जिमाका)-  परिवहन विभागामार्फत 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजीत करण्यात आला असुन सप्ताहाचा प्रारंभ सोमवार दि. 13 रोजी सकाळी साडेदहा वा. होणार आहे. या  कार्याक्रमाचे  आयोजन ल.रा.तो.  महाविद्यालय सिविल लाईन येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे  हे राहणार असुन पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ  बच्चु कडु यांच्या उद्घाटक  म्हणुन निमंत्रित करण्यात आले आहे.  या  कार्यक्रमास महापौर अर्चना मसने, विधान परिषद सदस्य   आ. गोपीकिशन बाजोरीया, आ.डॉ. रणजित पाटील, आ. श्रीकांत देशपांडे , विधानसभा सदस्य आ.  गोवर्धन शर्मा,  आ. प्रकाश  भारसाकळे  ,आ. हरिष पिपंळे ,  आ. रणधिर सावरकर, आ. नितीन  देशमुख यांनी विशेष अतिथी म्हणुन  निमंत्रित करण्यात आले आहे. तर या सोहळ्यास   जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधिक्षक अमोघ गावकर,   मनपा आयुक्त संजय कापडणीस , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. प्रभु चापके यांची उपस्थिती राहणार  आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकार  , सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  गोपाल वरोकार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ