राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गुरूवारी (दि. 16) जिल्ह्यास्तरीय प्रशिक्षण वर्ग


अकोला,दि.14 (जिमाका)-     राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (गळीत धान्य विकास कार्यक्रम) व राष्ट्रीय  कृषि विकास योजनेंतर्गत कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, जैविक शेती मिशन, तसेच आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. 16 जानेवारी रोजी जिल्ह्यास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी  10 वाजता करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.  पंजाबराव  देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे राहणार आहेत.  यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय कृषि सहसंचालक अमरावती सुभाष  नागरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
या प्रशिक्षण वर्गामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजना , सेंद्रिय शेती काळाची गरज, सेंद्रिय कृषि मालाचे प्रमाणीकरण , करडई,  भुईमुग पीक लागवड तंत्रज्ञान, खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबीन  बियाणे कमतरता लक्षात घेत शेतक-यांनी घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान , कापुस , हरभरा  पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन, मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन, किटकनाशके हाताळताना  घ्यावयाची काळजी, शेतकरी उत्पादक कंपनी व गट शेतीचे  महत्व व योजना , आत्मा  योजनेत कृषि मित्रांची  प्रमुख भुमिका  आदी विषयांवर विषयतज्ज मार्गदर्शन करणार आहेत.
 या प्रशिक्षण वर्गाला शेतक-यांनी मोठया संख्येत उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन    जैविक शेती  मिशनचे प्रकल्प संचालक आरीफ  शहा,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, सेंद्रिय  शेती व  संशोधन  केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ पासलावार, उपविभागीय कृषि अधिकारी अजय कुळकर्णी यांनी केले आहे.
00000


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ