उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार 31 जानेवारी पर्यंत प्रवेशिका मागविल्या



        अकोला,दि.13 (जिमाका)-   राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क  महासंचालनालयामार्फत उत्कृष्ठ  पत्रकारिता, उत्कृष्ठ  लेखन  आणि उत्कृष्ठ   दूरचित्रवाणी , वृत्तकथा,  उत्कृष्ठ  छायाचित्रकार  पुरस्कार , सोशल मिडीया  पुरस्कार , स्वच्छ  महाराष्ट्र जनजागृती  पुरस्कार  स्पर्धा   जाहीर करण्यात आली आहे. 2019 या  कॅलेंडर वर्षा करीता  दि. 1 जानेवारी  2019 ते   31 डिसेंबर 2019 पर्यंतच्या  कालावधीसाठी प्रवेशिका  मागविण्यात  येत आहे. प्रवेशिका  पाठविण्याची  अंतिम  तारीख  31 जानेवारी 2020 अशी राहील. उत्कृष्ठ  पत्रकारीता पुरस्कार 2019 चे माहिती पत्रक /अर्जाचे नमुने www.dgipr.maharashtra.gov.in    या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असे जिल्हा माहिती अधिकारी, अकोला यांनी कळविले आहे.   00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ