मुर्तिजापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम घोषित


        अकोला,दि.31 (जिमाका)- मा. राज्य निवडणूक आयोगानी मुर्तिजापुर तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षधाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. या अंतर्गत  विशेष ग्रामसभा आयोजीत करून प्रारूप प्रभाग  रचनेवर आरक्षणाची सोडत (अनुसूचित जमाती व नागरिकांचा  मागास प्रवर्गातील महिलांसह)  काढणे करीता  अध्यासी अधिकारी नेमुन विशेष  ग्रामसभेचा कार्यक्रम आखणे आवश्यक आहे.
            पारद,लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, टिपटाळा,  हिरपुर,  कवठा, (खोलापुर)  सोनोरी (बपोरी) कुरूम , माटोडा, धामोरी बु. राजुरा घाटे, धानोरा (पाटेकर)   या ग्रामपंचायतीचा  1  फेब्रूवारी  रोजी, भटोरी, गोरगांव, सांगवी , बपोरी , कवठा (सोपीनाथ)  कार्ली, खांदला, निंभा, विराहीत , मोहखेड, अनभोरा, जामठी बु. हातगाव, चिखली, या ग्रामपंचायतीचा  3 फेब्रूवारी रोजी , मंगरूळ कांबे, कंझरा या  ग्रामपंचायतीच्या  4 फेब्रूवारी रोजी संबंधीत  ग्रामपंचायतीच्या  कार्यालयात सकाळी 10 वाजता विशेष ग्रामसभेचे  आयेाजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये राज्य निवडणुक  आयोगाच्या  निर्देशाप्रमाणे  ग्रामपंचायतीचे सर्व  सदस्य आरक्षण  निश्चित करण्यात येणार आहे. 
            संबंधीत ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक व तलाठी यांनी सदर ग्रामसभेसाठी  संपुर्ण  कायक्षेत्रात  पुरेसी प्रसिध्दी द्यावी. सभेच्या  वेळी हजर  राहुन अध्यासी अधिकारी   यांना कामकाज  चालविण्यास मदत  करावी.
            सदर नेमुन  दिलेले काम अत्यंत  काळजीपुर्वक व चोखपणे पुर्ण करावे . कामात हलगर्जी, टाळाटाळ, दिरंगाई केल्यास निवडणूक नियमाप्रमाणे  कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी असे निवडणूक अधिकारी ग्रामपंचायत तथा तहसिलदार पातुर यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ