वृद्ध साहित्यिक व कलावंताच्या मानधनाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 पर्यंत मुदत


            अकोला,दि.10 (जिमाका)-    वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजने अंतर्गत मानधन  दिले जाते, त्यासाठी जिल्ह्यातील वृद्ध कलावंत साहित्यिकांकडून शुक्रवार दि.31 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच ज्यांना या योजनेअंतर्गत मानधन मिळते अशा वृद्ध साहित्यिक व कलावंतानी गट विकास अधिकारी   पंचायत समिती  यांच्यामार्फत हयात असल्याचे  दाखले 31 जानेवारी पुर्वी सादर करावे. तसेच सन  2019-20 या वर्षाकरीता वृद्ध साहित्यिक व कलावंताचे मानधनाचे प्रस्ताव गट विकास  अधिकारी पंचायत समिती सर्व यांच्याकडे आवश्यक  त्या  कागदपत्रासह दि. 31  जानेवारी   पुर्वी सादर करावे,असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी कळविले आहे. यासंदर्भात वृद्ध साहित्यीक व  कलावंताचे हयातीचे दाखले प्राप्त करण्यासाठी संबंधीत पंचायत समितींना सुचना देण्यात आल्या आहेत,असेही कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ