मतदार दिवसानिमित्य विविध स्पर्धा


अकोला,दि.17 (जिमाका)- भारत‍ निवडणूक आयोग नवी दिल्‍ली यांचे निर्देशानूसार दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी  राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. त्‍याअनूषंगाने 18 वर्षे पुर्ण केलेल्‍या नविन तरूण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्‍यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा प्रमूख उद्देश असणार आहे.
            त्‍याअनूषंगाने दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी ‍शिक्षणाधिकारी  यांचे अध्यक्षतेखाली विविध शाळा, महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा,  वादविवाद  स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्वीझ कॉम्पीटिशन इ. विविध स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे.
            स्पर्धेचे नाव -  वक्तृत्व स्पर्धा 3 मिनिटे- सुदृढ लोकशाही साठी मतदानाचा हक्क बजावणे , ही काळाच गरज आहे, रांगोळी स्पर्धा- निवडणुक प्रक्रियेशी संबंधीत विषयाबाबत रांगोळी रंगविणे, निबंध स्पर्धा- लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका. या स्पर्धामधील विजेता व उपविजेता असणा-या विद्यार्थी यांना प्रमाणपत्र  देवून गौरविण्यात  येणार आहे. या स्पर्धामध्ये सर्व शाळा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून आपली लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचे दृष्टीकोनातुन प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
                                                                00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ