जि.प./पं.स.निवडणुक; उमेदवारांना अंतिम खर्च मागविला



अकोला,दि.२८(जिमाका)-  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या  निवडणुकीचा दैनंदिन व अंतिम खर्च  सर्व उमेदवारांना विहित मुदतीत सादर करणे  बंधनकारक  आहे.  अकोला तालुक्यातील जिल्हा परिषद  व पंचायत समितीचे  मिळून १४२ उमेदवार रिंगणात होते. त्यांनी दि.४ जानेवारीला दिलेल्या नोटिसीनुसार  विहीत मुदतीत दैनंदिन खर्च  सादर करणे आवश्यक होते. ज्या उमेदवारांनी अद्यापही आपला  दैनंदिन खर्च सादर केलेला नाही अशा उमेदवारांनी  आपला दैनंदिन खर्च व शपथपत्र  नमुना  क्रं. बाँड पेपरवर विहीत मुदतीत सादर करावा. अन्यथा  खर्च सादर न करणाऱ्या  उमेदवारांवर महाराष्ट्र जिल्हा परिषद  व पंचायत समिती अधिनियम १९६१मधील , १५ ख ()  व कलम ६२ क (), १९६१ मधील १५ ख (),  कलम ६२ क () अन्वये कारवाईचा  प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल. अंतिम खर्च सादर न करणारे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे  पद धोक्यात येईल आणि  निवडणूकीत पराभव झालेल्यांना पुढील निवडणूकीत  उभे राहता येणार नाही. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ खर्च सादर करावा अशी सुचना  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी केली आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ