राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यातील 1 लाख 82 हजार बालकांना 19 रोजी देणार डोस



      अकोला,दि.3 (जिमाका)-  राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार, दि. 19 रोजी राबविण्यात येणार आहे.  या मोहिमेत   जिल्ह्यातील 1 लाख 82 हजार  757 बालकांना  पोलिओचा डोस  देण्याचे उदिष्ट्य ठरविण्यात आले असुन, त्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य व अन्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
            या संदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा गुरूवारी (दि. 2) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
            यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले तसेच महानगरपालिका , शिक्षण विभाग, विज वितरण कंपनी  इ. विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी माहिती  देण्यात आली की, जिल्ह्यातील शुन्य ते पाच  वर्षे वयोगटातील 1 लाख 82 हजार 757 बालकांना या वेळी डोस दिला जाईल.  त्यात 1 लाख 3 हजार 521 बालके ग्रामीण भागातील असुन महापालिका क्षेत्र वगळता शहरी भागातील 26 हजार  384 बालके तर  महापालिका क्षेत्रातील 52 हजार 852 बालकांचा समावेश आहे.
            या बालकांना रविवार दि. 19 रोजी पोलिओचा डोस पाजण्यासाठी 1392  बुथ वर सोय  करण्यात आली आहे.  एकुण 3600 कर्मचारी या कामासाठी सज्ज करण्यात आले आहेत. या मोहिमेवर 280 पर्यवेक्षकांचे नियंत्रण राहणार आहे.
            हे सर्व बुथ हे शासकीय रूग्णालये, खाजगी दवाखाने, बस स्थानक रेल्वे स्थानक  अशा ठिकाणी सज्ज ठेवण्यात येणार आहे.
            या मोहिमेसाठी सर्व संबंधीत यंत्रणांनी परस्पर समन्वय राखुन काम करावे व  जिल्ह्यातील प्रत्येक बालकास पोलिओचा डोस पाजला जाईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर  यांनी दिले.
                                                                         00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ