छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम


अकोला,दि.4 (जिमाका)-  भारत निवडणूक आयोगाचे सुचनेनुसार दिनांक 1 जानेवारी  2020 अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र  मतदार  यादीचा  विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
छायाचित्र  मतदार यादीचा  विशेष  संक्षिप्त   पुनरिक्षण  कार्यक्रम अर्हता दिनांक  1 जानेवारी 2020 वर आधारित  ची अंमलबजावणी मा.निवडणूक  आयोगाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार 30 अकोला पश्चिम  विधानसभा मतदार  संघामध्ये  राबविण्यात येणार आहे.  तरी याबाबतची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी असे उपजिल्हाधिकारी (महसुल) तथा मतदार नोंदणी  अधिकारी 30- अकोला पश्चिम  मतदार संघ यांनी केली आहे.
पुर्व- पुनरिक्षण कार्यक्रम मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) कॅम्पेन मोडमध्ये SVEEP च्या मदतीने आणि मतदान  केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण सारख्या इतर पुर्व-पुनरिक्षण कार्यक्रमाव्दारे  सोमवार दि. 11 नोव्हेंबर 2019 ते  गुरूवार , ‍दि.13 फेब्रूवारी 2020 पर्यंत , पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी  पर्यंत प्रसिद्धी करणे  , शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी ते  शुक्रवार दि. 27 मार्च   पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येतील,
 शनिवार दि. 7 मार्च   आणि रविवार दि. 8 मार्च   रोजी  शनिवार दि. 14 मार्च  आणि  रविवार दि. 15 मार्च  रोजी  विशेष मोहिम राबविण्यात येईल. बुधवार  दि. 15 एप्रिल 20 पुर्वी  दावे व हरकती निकालात काढण्यात येतील,  प्रारूप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या  अंतिम प्रसिद्धी करीता आयोगाची परवानगी  घेणे. शुक्रवार  दि. 24 एप्रिल 20 पुर्वी, डाटाबेसचे अदयावतीकरण आणि पुरवणी याद्यांची  छपाई इत्यादी  गुरूवार  दि. 30 एप्रिल 20 पुर्वी , मतदार यादीची अंतिम  प्रसिद्धी  मंगळवार  दि. 5 मे 2020 करण्यात येईल.
                                                           00000
     





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ