पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हादौरा


            अकोला,दि.२४(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार कल्याण विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शनिवार दि.२५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.२५ रोजी- सकाळी सहा वाजता हावडा मेलने अकोला येथे आगमन, सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन व राखीव, सकाळी नऊ ते दुपारी  एक वाजेपर्यंत  मत्स्य विकास विभाग, जिल्हा परिषद सेस फंड,  लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा निबंधक सहकारी संस्था,  कार्यकारी अभियंता सिंचन विभाग, जि.प. अकोला, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री सडक योजना, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पुरातत्व वास्तू विकास विभाग, जिल्हा नियोजन समिती पूर्व आढावा अशा विविध बैठकांना उपस्थिती, स्थळः जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. दुपारी एक ते दोन नगरसेवक नितीन झापर्डे यांच्याकडे सदिच्छा भेट, दुपारी दोन ते चार जिल्हा नियोजन समितीची बैठक, स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला,  दुपारी चार ते सायं पाच वा. राखीव,  सायं. पाच वा. चोहोट्टा बाजार मार्गे सावरा ता. अकोट कडे प्रयाण, सायं. सहा वा. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी  मर्या. सावरा ता. अकोट यांच्या नुतन इमारतीचे उद्घाटन समारंभास उपस्थिती, सायं. सात वा. अकोल्या कडे प्रयाण, सायं. ८ वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, रात्री आठ वा. ओझोन हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट, रात्री साडेआठ वा. श्री.अग्रवाल,यांचे निवासस्थानी भेट, रात्री नऊ वा. डॉ. शैलेश देशमुख, दुर्गा चौक, रात्री साडेनऊ वा.  निखील ताथोड, मराठा नगर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
रविवार दि.२६ रोजी- सकाळी नऊ वा. दहा मिनीटांनी शासकीय विश्रामगृह अकोला येथून लाल बहादूर शास्त्री स्टेडीयमकडे प्रयाण,  सकाळी नऊ वा. १४ मि. नी  लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे आगमन व सव्वा नऊ वा. शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास  उपस्थिती, सकाळी १० वा २० मि. नी. लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथून कृषि उत्पन्न बाजार समितीकडे प्रयाण, सकाळी साडेदहा वा, कृषि उत्पन्न बाजार समिती अकोला येथे  शिवभोजन थाळी योजना लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, सकाळी ११ वा. १० मि. नी. जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे शिवभोजन थाळी योजना लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, सकाळी साडेअकरा वा.  बाळापूर मार्गे शेगावकडे  प्रयाण, दुपारी सव्वा बारा वा. शेगाव येथे आगमन व राखीव, दुपारी दीड वा.अकोला मार्गे करोडी चोहट्टा बाजारकडे प्रयाण, दुपारी अडीच वा. करोडी येथील संत गाडगेबाबा पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी तीन वा.  अकोट अंजनगाव सुर्जी मार्गे बेलोरा ता. अचलपूर कडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ