जि.प. ,पं.स सार्वत्रिक निवडणूक निवडणूक खर्चाचा अंतिम हिशोब शुक्रवार दि. 7 रोजी सादर करणे बंधनकारक


        अकोला,दि.31 (जिमाका)- अकोला जिल्हा परिषद  व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2020 ची निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा अंतिम हिशोब शुक्रवार  दि. 7 फेब्रूवारी आपल्या  विभागातील उपविभागीय अधिकारी यांचे कडे  जमा करून अपात्रतेची कार्यवाही टाळावी असे आवाहन  उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी  जि.प.पं.स निवडणूक विभाग अकोला यांनी केले आहे.
            उमेदवारांचा निवडणूक खर्च स्विकारण्याकरिता  तेल्हारा व अकोट  तालुका करीता  उपविभागीय अधिकारी अकोट, बाळापुर व पातुर तालुका करीता  उपविभागीय अधिकारी बाळापुर, मुर्तिजापुर व बार्शिटाकळी तालुका करीता उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर व अकोला तालुका करीता  उपविभागीय अधिकारी  अकोला  यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
            जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वित्रिक निवडणुकीचा कार्यक्रम  दिनांक  19  नोव्हेंबर  2019  रोजी  मा. राज्य  निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला होता. निवडणूक  कार्यक्रमानुसार दि.  7 जानेवारी 2020 रोजी मतदान  व दि. 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी पुर्ण  करण्यात आली आहे.
             राज्य  निवडणुक आयोगाचे  निर्देशान्वये निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी निवडणूकीत केलेल्या खर्चाचा दैनंदिन हिशोब मतमोजणीचे  दिनांकापर्यंत दररोज तसेच निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब मतमोजणीचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत सादर  करावयाचा आहे. निवडणूक  खर्चाचा  हिशोब   देण्यास कसूर केलेली व्यक्ती राज्य निवडणूक  आयोगाचे  दिनांक  3 ऑगस्ट 2016  मधील आदेशान्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 15 ब नुसार   ती  व्यक्ती आदेशाच्या दिनांकापासुन पाच वर्षाच्या  कालावधीकरीता निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात येईल.
            ज्या उमेदवारांनी माघार घेतली किंवा  जे उमेदवार बिनविरोध निवडुन आलेले  आहेत अशा उमेदवारांनी सुद्धा माघारीचे दिनांकापर्यंतचा  अंतिम  खर्च सादर करणे बंधनकारक आहे.  00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम