रस्ता सुरक्षा सप्ताह समारोप




        अकोला,दि.18 (जिमाका)- राज्यात 31 वा राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा सप्ताह  दि. 11 ते 17  जानेवारी या कालावधीत राबविण्यात आला. या  कार्यालयाकउुन या  कालावधीत विविध  रस्ता सुरक्षा  विषयक कार्यक्रम राबविण्यात आहे.  रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप पिंजर ता. बार्शिटाकळी जि. अकोला येथे 17 जानेवारी रोजी संपन्न झाला.
            या वर्षाचा रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नाविन्यपुर्ण व वैशिष्ट्य पुर्ण झाला. समारोप कार्यक्रम  संत गाडगेबाबा  आपतकालीन  शोध व बचाव पथक  पिंजर व या कार्यालयाच्या संयुक्तीकरित्या पिंजर ता. बार्शिटाकळी येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुबोधचंद्र लहाने, अध्यक्ष भाऊसाहेब लहाने आर्ट कॉलेज पिंजर हे होते.  प्रमुख उपस्थितीमध्ये  सहाय्यक  प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार,  डॉ. रावनकर,  शेख, पोलीस निरिक्षक महामार्ग  पोलीस यांचा सहभाग लाभला.  कार्यक्रमाअंतर्गत दिपकराव सदाफळे व त्यांची पुर्ण टीम संत गाडगेबाबा आपातकालीन शोध व  बचाव पथक पिंजर यांनी आपातकालीन परिस्थीती उद्भवल्यास   या क्षणी करावयाच्या तातडीच्या  उपाययोजना  बाबतचे  मॉकड्रिल करून दाखविले. या प्रसंगी डॉ. रावनकर यांनी अपघात घडल्यानंतर प्रथमोपचार करणे व अपघात स्थळापासुन दवाखान्यापर्यंत अपघात ग्रस्तास  कशा प्रकारे पोहचवायचे याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन केले.
            समारोप  कार्यक्रमाचा भाग म्हणुन पिंजर येथील ज्ञान प्रकाश कनिष्ठ  महाविद्यालय, महात्मा ज्योतीबा  विद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व भाऊसाहेब  लहाने आर्ट कॉलेज यांच्या  सुमारे 2200 विद्यार्थ्यांची  रस्ता सुरक्षा विषयक घोष  वाक्यांचे बॅनर्स घेवुन  व घोषना देवुन पिंजर शहरात रॅली काढण्यात आली.
            समारोप  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच अधिकारी  अभिजित टाले  मो.वा. नि.,  योगिता मगर मो.वा. नि.,  प्रफुल्ल मेश्राम मो.वा. नि.,   कृष्णा नेवरे सहा. मो.वा. नि.,   गोपाल पंचोली सहा. मो.वा. नि.,  मनोज शेळके सहा. मो.वा. नि., भागवत  चोपडे सहा. मो.वा. नि.,  उमेश तिवारी व.लि.,  सुहास  वानखेडे क.लि., अभिजित गांवडे क.लि. , दिपक मोरे स्वच्छक  तसेच वेग मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे  आनंद उजाडे व जय गजानन पि.यु.सी. सेंटरचे कपील सिरसाठ यांनी  परिश्रम घेतले.
                                  00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ