महामार्ग, उड्डाणपूल कामांना गती द्या; केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे आढावा बैठकीत निर्देश


अकोला,दि.10 (जिमाका)-  जिल्ह्यातील व शहरातील दळणवळण सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत तसेच सार्वजनिक विभागामार्फत होत असलेल्या रस्ते बांधकाम व उड्डाणपूल उभारणीच्या कामाला सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून कामांना गती देऊन लोकांना गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी,असे निर्देश केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान,  इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  लोकशाही  सभागृहात आज ना. धोत्रे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.  या बैठकीस  महापौर  अर्चना मसने, विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरीया,विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे , आ. हरिष पिपंळे, आ. रणधीर सावरकर  , आ. नितीन देशमुख,  तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , मनपा आयुक्त संजय  कापडणीस , निवासी उप जिल्हाधिकारी संजय  खडसे  तसेच भारतीय विमानतळ विकास  प्राधिकरण  राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,  आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य विज वितरण  कंपनी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना. धोत्रे यांनी अकोला  विमानतळ  राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 चे अकोला  जिल्हा  येथील कामे, अकोला ते मेडशी, अकोला ते देवरी अकोट, शेगाव ते  ते देवरी फाटा या महामार्गाच्या कामाच्या  सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. तसेच अकोला शहरात  सध्या सुरू असलेल्या विविध उड्डाण पुलाच्या  बांधकामाच्या प्रगतीचा  आढावा घेतला. त्याचप्रमाणे अकोट विधानसभा  क्षेत्र , रेल्वे उड्डाणपुल इ.  विकासकामांची सद्यस्थिती जाणुन घेतली. यावेळी माहिती देण्यात आली की, शिवणी विमानतळाकरीता 22.24 हे .आर. खाजगी  जमिन संपादित  करावयाची  आहे. त्यासाठी  निधी मागणी करण्यात आली आहे.  तसेच राष्ट्रीय  महामार्ग  क्रं. 6 च्या कामांच्या विविध टप्प्यांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यात आली. रस्त्याची कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत ना. धोत्रे यांनी सुचना  केल्या. कामे पुर्ण होईपर्यंत  नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी सुरक्षित प्रवासासाठी  योग्य दर्जाचे वळण रस्ते तयार करावे,  असे निर्देश  देण्यात आले. त्यानंतर ना. धोत्रे यांनी जिल्ह्यातील  टेलिफोन सेवा कंपन्यांचा, सुपर  स्पेशालिटी  हॉस्पिटलच्या  कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ