मधमाशीपालन केंद्र योजनेसाठी अर्ज आमंत्रीत

अकोला,दि.20 (जिमाका)-  महाराष्ट्र राज्य  खादी  व ग्रामोद्योग  मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) संपुर्ण  राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती / संस्थाकडुन अर्ज मागविण्यांत येत आहे.
योजनेची वैशिष्ट्ये-   मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण , साहित्य स्वरूपात  50 टक्के अनुदान  व  50 टक्के  स्व: गुतंवणुक, शासनाच्या हमी भवाने मध खरेदी,  विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व  संवर्धनाची जनजागृती.
योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता- 
वैयक्तीक मधपाळ- पात्रता – अर्जदार साक्षर असावा, स्वताची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त.,
केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ- व्यकती पात्रता- किमान 10 वी पास,  वर्य वर्ष 21 पेक्षा जास्त , असा व्यक्तीच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील  कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान 1 एकर  शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन,  लाभार्थीकडे  मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी 
केंद्रचालक संस्था- पात्रता- संस्था नोंदणीकृत  असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान 1000  चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेले सेवा असावीत.
केंद्रचालकास 50 मधपेट या 4 हजार 200 रूपये प्रमाणे 50 टक्के अनुदानावर घेण्यासाठी 50 टक्के रक्कम या  कार्यालयास प्रथम जमा करणे अनिवार्य आहे.
अटी व शर्ती- लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य.
अधिक माहितीसाठी संपर्क- 
            जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,  महाराष्ट्र राज्य खादी  व ग्रामोद्योग मंडळ, व्दारा-जिल्हा उद्योग केंद्र, जुना कॉटन मार्केट,   अकोला  दुरध्वनी क्रं.0724-2430250
संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र  राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5 , मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा – 412806, दुरध्वनी -02168-260264.
वरीलप्रमाणे योजनेची वैशिष्ट्ये, अटी व शर्ती आहेत. तेव्हा त्या  पुर्ण करून त्या प्रमाणे प्रस्ताव या कार्यालयास  सादर करण्यांत यावा म्हणजे निवडी बाबतचा विचार करण्यात येईल, असे जिल्हा ग्रामोद्योग  अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ