ग्रा.पं. विकास आराखडा कार्यशाळा 14 व्या वित्त आयोगाची अखर्चित निधी खर्च करा - आयुष प्रसाद


            अकोला,दि.22 (जिमाका)-   14 व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी 31 मार्च  पुर्वी शंभर टक्के खर्च करा अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी  कार्यालयातील  नियोजन भवनात राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातंर्गत आमचं गाव, आमचा विकास  या उपक्रमामध्ये सन  2020-21 ते 2024-25 या  कालावधीच्या पंचवार्षिक व सन  2020-21 या  वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत  विकास आराखडा तयार  करण्यासाठी जाणिव जागृतीकरीता सर्व जिल्हा परिषद  सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच व सचिव  यांची एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, अतिरीक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, जिल्हा कृषि विकास अधिकारी मुरली इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे  प्रकल्प संचालक डॉ. मिश्रा तसेच पंचायत समितीचे सभापती उपस्थित होते.
येत्या 31  जानेवारी   पर्यंत सर्व  ग्रामपंचायतीमध्ये  ग्रामसभा घेऊन आमचा गाव आमचा विकास  या  उपक्रमातंर्गत  ग्रामपंचायत विकासाचा आर्थ‍िक आराखडा  तयार करावा असे सांगून  आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, गावांगावांत रोजगार हमी योजना, सार्वजनिक विहीरी, शौचखड्डे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोदामे तसेच महामार्गावर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम  आदींची कामे  प्राधान्याने करावीत.लोकप्रतिनिधींनी योग्य कामाचा पाठपुरवठा करून आपल्या श्रेत्रात विकास करावा. महिला लोकप्रतिनिधींनी गावातील  महिलांच्या अडचणी समजवून घेऊन गावाच्या विकासासाठी  सहकार्य करावे असे त्यांनी  सांगीतले. महिलांच्या  सशक्ती करणासाठी गावागावात महिला बचत गट स्थापन करावे असेही आवाहन  आयुष प्रसाद यांनी केले.
ग्रामपंचायत  निहाय आराखड्यामध्ये कोणत्या योजनाचे समाविष्ठ करावे. त्यासाठी   कोणती कागदपत्रे  व योजनांचे  निकष  याबाबत  उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी आपल्या प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे संचालन कृषि विस्तार अधिकारी रोहिदास भोयर यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य , पंचायत समितीचे  सदस्य,  सरपंच व सचिव उपस्थित होते.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ