अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये प्रवेश



अकोला दि.29 (जिमाका) - प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला,वाशिम व बुलढाणा जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना  शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली 2 री मध्ये प्रवेश देण्याकरीता  प्रवे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात विनामुल्य मिळतील.प्रवेश अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. प्रवेश अर्ज परिपुर्ण भरून सादर करण्याची अंतीम तारीख  शनिवार दि.15 फेब्रूवारी  आहे .
इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री  मधे प्रवेश घेण्यासाठी अटी व शर्ती
या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा,पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी,जर विद्यार्थी दारीद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करण्यात यावा,या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाख च्या आत असणे आवश्यक आह . इयत्ता 1 ली प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल, या योजनेचा लाभ घेवू इच्छिणा-या विदयार्थाचे पालकानी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावे,आदिम जमातीच्या विदयार्थाची तसेच विधवा/घटस्फोटित/निराधार/परित्क्त्या व दारिद्र रेषेखालीलकुटूंबातील अनुसूचीत जमातिच्या विदयार्थाची प्राधान्याने निवड करण्यात येईल.
विदयार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल,या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र घेण्यात येईल,वर्ग 2 साठी शिकत असलेल्या शाळेमधिल मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र,आधार कार्डची झेरॉक्स प्रत विदयार्थाची जोडावी,खोटी माहीती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी कळविले आहे.
                                                                      00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ