जिल्हापरिषदचे सभापती पदाच्या निवडीसाठी 30 जानेवारी रोजी सभा


        अकोला,दि.20 (जिमाका)-   जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष  व उपाध्यक्ष सभेनंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961  मधील कलम  83 च्या तरतुदीन्वये जिल्हा  परिषदेची विशेष  सभा अयोजीत करून विषय समित्यांचे  एकुण 5 पैकी 4 सभापती पदाच निवड  करावयाची आहे.  त्याकरीता गुरूवार दिनांक 30 जानेवारी  दुपारी 3.00 वाजता विशेष सभा अकोला जिल्हा परिषदेचे सभागृह, जिल्हा परिषद  कार्यालय अकोला येथे आयोजीत  करण्यात आली  आहे.  विषय समित्यांचे सभापती  पदाच्या निवडणूकीकरीता पिठासीन अधिकारी म्हणुन  उपविभागीय अधिकारी अकोला यांची नियुक्ती  करण्यात  आली आहे. सदर विशेष सभेमध्ये समाज कल्याण समिती सभापत  पदाची निवडणुक करणे, महिला व बाल कल्याण समिती सभापती पदाची निवडणूक करणे तसेच, उर्वरीत 2 विषय समित्यांचे सभापतीची निवड करण्यात  येईल.
            त्याकरिता  नामनिर्देशन  पत्र पिठासीन अधिकारी  यांचे कडे गुरूवार( दि. 30) रोजी सकाळी 11 ते  दुपारी  1 वाजेपर्यंत  पिठासीन अधिकारी यांचे कडे अकोला  जिल्हा  परिषदेचे  सभागृहामध्ये विहीत नमुन्यात दाखल करता येतील, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.पं.स निवडणुक विभाग अकोला यांनी कळविले आहे.
                                                                         00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ