सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज ‘महिला व सायबर सुरक्षा’ या विषयावर कार्यशाळा


अकोला,दि.2 (जिमाका)- सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शुक्रवार दि. 3 रोजी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने महिला व सायबर सुरक्षा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 3 रोजी सकाळी  11 वाजता लोकशाही सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे ही कार्यशाळा होणार आहे.
 या  कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे राहणार असुन  प्रमुख मार्गदर्शन  श्रीमती मोहिनी मोडक या करणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व जेष्ठ पत्रकार  शौकतअली मिरसाहेब  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
                   या कार्यशाळेला सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे  प्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील महिला अधिकारी/ कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ