धार्मिक अल्पसंख्याक शाळांचा पायाभुत सुविधा विकास; प्रस्ताव सादर करण्यास मुदत वाढ


अकोला,दि.२८(जिमाका)- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित/विना अनुदानित/ कायमविना अनुदानित  शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण  संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग  शाळामध्ये पायाभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन  २०१९-२० अंतर्गत  शासनाकडे केलेल्या  विनंतीनुसार  मुदतवाढ मिळाली आहे.  हे अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळा/ संस्थांनी अल्पसंख्यांक विभागाच्या प्रचलित शासन निर्णयानुसार परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास  त्वरीत सादर  करावेत. शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र नसतांना प्रस्ताव  सादर करण्यात येवू नये. यांची संबंधितांनी नोंद घ्यावी , असे जिल्हाधिकारी अकोला यांनी कळविले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ