तालुका, उपविभाग आणि जिल्हास्तरावर दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती


            अकोला,दि.23 (जिमाका)-  दिव्यांग व्यक्तिंच्या समस्यांच्या निवारणासाठी जिल्ह्यात  दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत. तालुका ते जिल्हास्तरावरील अधिकारी दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम पाहतील,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले. दिव्यांग व्यक्तींना कोणतीही  तक्रार असल्यास  तक्रार निवारण अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केली आहे.
            दिव्यागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थाकडुन 3 टक्के  निधी राखीव ठेवण्यात येतो. या निधीच्या खर्चाबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नगराध्यक्ष मोनालीताई गांवडे,  जयश्रीताई, पुंडकर, माकोडे, प्रभाताई कोथळकर, जिल्हा समाज कल्याण  अधिकारी वसतकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी श्रीमती टवलारे उपस्थित होते.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी असलेला अखर्चित निधी जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण  निधीकडे वळता करावा असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेत. ग्रामपंचायतींनी गावनिहाय दिव्यांगांची यादी तयार करून त्याप्रमाणे योजना   करून अंमलबजावणी करण्याच्या सुचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी , नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक संस्थानिहाय दिव्यांग कल्याण निधीतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
दिव्यांगांसाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून तालुकास्तरावर तहसिलदार, उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी व जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी हे काम पाहतील,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ