नागरिकांची कामे प्रलंबित राहू नये यासाठी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांचा पुढाकार


अकोला,दि.18 (जिमाका)- नागरिकांची कामे प्रलंबित राहू नये तसेच नागरिकांच्या प्रकरणांचा वेळेस निपटारा व्हावा त्यांची आणि अधिकाऱ्यांची भेट सहजतेने व्हावी तसेच मध्यस्थांची गरज राहू नये नागरिक आणि अधिकारी यांचा थेट संपर्क प्रस्थापित व्हावा याकरिता विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावले उचललेली आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल नव्यानेच उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पदाचा प्रभार स्विकारलेले उपजिल्हाधिकारी राजेश खवले व त्यांचे कर्मचारी वृंद यांनी उचलले आहे.
या कार्यालयाने चक्क असा बोर्ड लावलेला आहे की , नागरीक हे अधिकाऱ्यांना थेट भेटू शकतात.  आपले प्रलंबित काम सांगू शकतात अधिकारी यांना भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही तसेच आपले कार्यालय हे भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी असल्याचे या कार्यालयाने बोर्ड लावून जाहीर केलेले आहे अशा प्रकारचा बोर्ड लावल्या जाणे ही क्वचितच घडणारी बाब आहे.
दिवसेंदिवस प्रशासनाची पावले ही भ्रष्टाचार मुक्तीकडे आणि पारदर्शी प्रशासनाकडे वळत आहेत. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन या कार्यालयाने लावलेला बोर्ड हे त्याच मार्गाने केलेली वाटचाल आहे असे  म्हणता  येईल प्रत्येक कार्यालयाने याप्रमाणे भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा पारदर्शी प्रशासनाचा संकल्प व्यक्त केला नागरिकांना भेटीचा सहज मार्ग उपलब्ध करून दिला नागरिकांचे प्रश्‍न तातडीने निकाली काढले तर प्रशासनाच्या प्रती जनसामान्यांच्या मनामध्ये सकारात्मक भावना निश्चितच वाढीस लागेल.
                                   00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ