जि.प.,पं.स. निवडणुक मतदान,मतमोजणीच्या दिवशी आठवडे बाजार बंद


अकोला,दि.3 (जिमाका)-  जिल्हा परिषद व  पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे  मतदान  मंगळवार दि. 7 रोजी तर मतमोजणी बुधवार दि. 8 रोजी होणार  आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदान दि. 7 व मतमोजणी  दि. 8 रोजी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  बंद ठेवण्यात येणारे  आठवडे बाजार हे गुरूवार दि.9 रोजी भरविण्यात यावे असेही आदेशित करण्यात आले आहे.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा