जि.प.,पं.स. निवडणूक मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर






अकोला,दि.(जिमाका)-  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी मंगळवार दि. ७ रोजी मतदान होणार असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणूक पूर्वतयारी संदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार उपस्थित होते.
पत्रकार परिषदेच्या प्रारंभी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपस्थितांना माहिती देण्यात आली की,अकोला जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत पंचायत समितीच्‍या सार्वत्रिक निवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.   या निवडणूकीसाठी मतदान मंगळवार दि.७ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळात अखंड होणार असून बुधवार दि. ८ रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनीटांपासून मतमोजणी सुरु होणार आहे.
८ लाख ४८ हजार ७०२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्ह्यातील सात तालुके मिळून एकूण ५३ (जि.प)गट तर १०६ गण (पं.स.)साठी ही निवडणूक होणार आहे. तेल्हारा तालुक्यात ८ गट असून १६ गण आहेत. अकोट तालुक्यात ८ गट, १६ गण, मुर्तिजापूर तालुक्यात ७ गट १४ गण, अकोला तालुक्यात सर्वाधिक १० गट, २० गण आहेत. तर बाळापुर तालुक्यात ७ गट, १४ गण, बार्शिटाकळी तालुक्यात  ७ गट १४ गण आहेत. पातुर तालुक्यात ६ गट १२ गण आहेत. अशा या ५३ गट आणि १०६ गणांमध्ये होणाऱ्या निवडणूकीत जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ९२४ महिला ४ लाख ६ हजार ७७७ पुरुष तर एक इतर असे ८ लाख ४८ हजार ७०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
एकूण १०१९ मतदान केंद्रावर होईल मतदान
जिल्ह्यातील एकूण १०१९ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्यात तेल्हारा तालुक्यात १३८, अकोट १६३, मुर्तिजापुर १५६, अकोला १९४, बाळापूर १३२, बार्शीटाकळी १३५, पाटूर तालुक्यात १०१ असे एकूण १०१९ मतदान केंद्रावर मतदान होईल. यात १६३ मतदान केंद्र संवेदनशील तर ५ अतिसंवेदनशिल आहेत,असेही सांगण्यात आले.
पाच हजाराहून अधिक अधिकारी- कर्मचारी तैनात
या निवडणूकीचे मतदान सुलभरित्या पार पाडण्यासाठी जिल्ह्यात एकूण ९८ झोन तयार करण्यात आले असून त्यासाठी १२० क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. शिवाय १३१० मतदान केंद्राध्यक्ष व ३९३० मतदान अधिकारी असे एकूण ५२४० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. हे सर्व अधिकारी आज (सोमवार दि.६)सायंकाळ पर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सुरक्षा व्यवस्था चोख
मतदान सुरळीत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.  जिल्ह्यातील १०१९ मतदान केंद्रांवर १० ठिकाणी  चेक पोस्ट संपूर्ण जिल्ह्यात तयार करण्यात आले असून  ७ उपविभागीय पोलीस अधिकारी , ११ पोलीस निरीक्षक, ९४ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, १७०८ पोलीस कर्मचारी  १०८८ होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी जिल्ह्यात १११ बस, ७ ट्रक, २३८ जीप अशा एकूण ३५६ वाहनांचा ताफा वापरण्यासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.
या निवडणूकीसाठी जिल्हा परिषद गटांसाठी  २७७  तर पंचायत समितीच्या गणांसाठी ४९२ उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे नियुक्त मुख्‍य निवडणुक निरिक्षक व निवडणुक निरिक्षक यांची माहिती-
१)     मुख्‍य निवडणुक निरिक्षक- अमोल येडगे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती
२)     निवडणुक निरिक्षक- सुनिल महिंद्रकर अपर जिल्‍हाधिकारी यवतमाळ (अकोला, अकोट,तेल्‍हारा,मुर्तिजापुर)
३)     निवडणुक निरिक्षक- दिनेश वानखडे अपर जिल्‍हाधिकारी वाशीम (बाळापुर, पातुर,बार्शिटाकळी)
या निवडणूकीचे तालुकानिहाय निवडणुक निर्णय अधिकारी यांची माहिती-
१)     निवडणूक निर्णय अधिकारी तेल्हारा रामेश्वर पूरी (९४२०७९९८२०)
२)     निवडणूक निर्णय अधिकारी अकोट रामदास सिद्धभट्टी (९४२०२९९६६६)
३)     निवडणूक निर्णय अधिकारी मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते (८४५३४५४५४५)
४)     निवडणूक निर्णय अधिकारी अकोला डॉ. निलेश अपार (७५८८८३२९८९)
५)     निवडणूक निर्णय अधिकारी  बाळापूर रमेश पवार (८४११९९९५०१)
६)     निवडणूक निर्णय अधिकारी बार्शिटाकळी अनिल खंडागळे (९६५७३५०६४४)
७)     निवडणूक निर्णय अधिकारी पातूर गजानन सुरंजे (८२७५०४९६२०)
मतमोजणी केंद्र व सुरक्षा कक्षः-  
तेल्हारा तालुका - नविन इमारत तहसिल कार्यालय, तेल्‍हारा
अकोट तालुका- ट्रायसेम सभागृह क्र.२ औद्योगीक प्रशिक्षण संस्‍था परिसर, आकोट
मुर्तिजापूर तालुका- शासकीय धान्य गोदाम क्रमांक ५.
अकोला तालुका- शासकीय धान्‍य गोदाम जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर अकोला
बाळापूर तालुका- शासकीय धान्‍य गोदाम, बाळापूर
बार्शी टाकळी तालुका- पंचायत समिती सभागृह बार्शिटाकळी
पातुर तालुका- पंचायत समिती सभागृह पातुर.
मतदानाची पद्धतः- जिल्‍हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता एकाच मतदान केंद्रावर मतदारांना एकाच मतदान यंत्रावरील दोन बटने दाबावी लागतील म्‍हणजेच दोन मते दयावी लागतील, त्‍यापैकी मतदान यंत्रावरील वरील भागात निवडणुक विभागातील उमेदवारांपैकी(जिल्‍हा परिषद उमेदवार) व खालील भागातील निर्वाचक गणातील उमेदवारांपैकी(पंचायत समिती उमेदवार) बटन दाबावे लागेल.
 मतदानाकरिता ओळखीचे पुरावे-जिल्‍हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्‍ये मतदारांची ओळख पटविण्‍यासाठी भारत निवडणुक आयोगाने दिलेल्‍या मतदार ओळखपत्रा व्‍यतिरिक्‍त अन्‍य १७ कागदपत्रे सादर करण्‍यास परवानगी दिलेली असुन ती कागदपत्रे खालीलप्रमाणे-
१.पासपोर्ट
२.वाहन चालविण्‍याचा परवाना
३.आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र
४.केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचा-यांना                       
 फोटोसहीत दिलेली ओळखपत्रे.
५.राष्ट्रीयकृत बॅंका अथवा पोस्ट ऑफीस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक.
६.स्वातंत्र सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र.
राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यं
७.सक्षम प्राधिका-याने अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/इतर मागासवर्ग/विमुकत्‍ जाती/भटक्‍या जमाती/विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादींना फोटासहित दिलेले प्रमाणपत्र.
८.सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
९.मालमतेबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी खत इत्यादी (फोटासहित)
१०.फोटोसहित देण्यात आलेला शस्त्रास्त्राचा परवाना
११. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र
१२.निवृत्त कर्मचाऱ्याचे फोटो असलेले पासबुक
१३.दिलेले निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांचे, फोटो असलेले प्रमाणपत्र
१४.दिलेले वयस्कर निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे, फोटो असेलेले प्रमाणपत्र
१५.केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य  विमा योजनेचे फोटोसहित कार्ड
१६.दिलेली शिधापत्रिका (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल. तसेच जर शिधापत्रिकेवर एकाच व्यक्तीचे नाव असल्यास त्याने स्वत:च्या वास्तवाचा अन्य पुरावा जसे वीज वापराचे देयक, दुरध्वनी वापराचे देयक,प्रॉपर्टी कार्ड किंवा घरपट्टी भरल्याची पावती सोबत आणणे बंधनकारक राहील.)
१७.आधार ओळखपत्र
            मतदारांनी मतदानाचे दिवशी भारत निवडणुक आयोगाने दिलेल्‍या मतदार ओळखपत्रा व्यतीरिक्त वरील पैकी कोणताही एक पुरावा मतदारांनी सादर करणे आवश्यक आहे,असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
तालुकास्तरावर मिडीया  सेंटर :-
या निवडणूकीत मतमोजणी केंद्रावर माध्यमांना माहिती देण्यासाठी तालुकास्‍तरावर मतमोजणी केंद्र परिसरात  मिडीया सेंटर स्थापन करावे, अशा सुचना निवडणूक निर्णय  अधिका-यांना जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत. या केंद्रावर माध्यम प्रतिनिधींना  प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश पत्र उपलब्धतेसाठीही व्यवस्था करावी, असे निर्देशित केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ