महात्‍मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजना शेतक-यांना बॅंक खाते आधार क्रमांकाशी जुळवून घेण्‍यासाठी सीएससी सेंटरवर संपर्क साधण्याचे आवाहन


                  अकोला,दि.30(जिमाका)- महात्‍मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेअंतर्गत ज्‍या           शेतक-यांकडे दिनांक 1 एप्रिल,2015 ते दिनांक 31 मार्च,2019 पर्यंत उचल केलेल्‍या एक किवा एकापेक्षा जास्‍त ज्‍या कर्ज खात्‍यात अल्‍पमुदत पीक कर्जाची दि 30 सप्‍टेंबर, 2019 रोजी मुद्दल व व्‍याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्‍कम रु 2.00 लाखापर्यंत आहे, अश्‍या शेतक-यांचे अल्‍प / अत्‍यल्‍प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्‍यांच्‍या कर्जखात्‍यात रु 2.00 लक्ष कर्जमुक्‍तीचा लाभ देण्यात येत आहे.
           अकोला जिल्‍हयात महात्‍मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात येत असुन सदर योजनेअंतर्गत जिल्‍हयातील राष्‍ट्रीयकृत, ग्रामीण, व्‍यापारी व जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक यांच्‍या अहवालानुसार 1,13,849 शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र आहेत. त्‍यापैकी 1,12,680 शेतक-यांचे कर्जखाते आधार क्रमांकाशी लिंक करण्‍यात आलेले आहेत. 1064 शेतक-यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी जुळवून घेंण्‍याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. याबाबत सर्व शेतक-यांना वारंवार प्रयत्‍न करुनही या शेतक-यांचे आधार क्रमांक अद्यापही मिळालेले नाहीत, तालुका निहाय स्थिती खालील प्रमाणे आहे.
अ.क्र.
तालुका
बॅंक खात्‍यासोबत आधार संलग्‍न नसलेल्‍या शेतक-यांची संख्‍या
1
अकोला
402
2
बार्शिटाकळी
146
3
अकोट
104
4
तेल्‍हारा
62
5
बाळापूर
60
6
पातूर
128
7
मुर्तिजापूर
162
एकुण
1064
      तरी या शेतक-यांनी आपले बॅंक खाते आधार क्रमांकाशी जुळवून घेण्‍यासाठी आपल्‍या जवळच्‍या CSC सेंटर / आपल्‍या बॅंक शाखेमध्‍ये / तलाठी यांच्‍यासमवेत संपर्क साधुन आधार क्रमांक बॅंक खात्‍याशी संलग्‍न करुन घेण्‍यात यावा. जेणे करुन महात्‍मा जोतीराव फुले कर्जमुक्‍ती योजनेमधुन कोणताही पात्र लाभार्थ्‍यी वंचित राहणार नाही असे जिल्‍हा प्रशासना व्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे ,असे  निवासी उपजिल्‍हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ