महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत
अकोला,दि. 31 (जिमाका)- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 16 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था/शाळा/विद्यालयांकडून दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 17 व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 16 डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय दिव्यांग बालना ट्य स्पर्धेची अंतिम फेरी जानेवारी 2020 मध्ये एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. बालनाट्य व दिव्यांग बालना ट्य स्पर्धेकरीता एक हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थ...