विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा; लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवा

 


        अकोला,दि.19(जिमाका)-  जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थिती व उपाययोजनाबाबत आज विभागीय आयुक्त यांनी आढावा घेतला. कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असून त्याच्यावर काटेकोरपणे उपाययोजना करावे. तसेच कोरोना विषाणुचा धोका कमी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी  दिले.

        जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीस ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपाचे आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, मनपाचे उपायुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. एम.डी. अष्टपुत्रे, डॉ. एन.ए. अंभोरे आदी उपस्थित होते.

        विभागीय आयुक्त यांनी जिल्हा व ग्रामीण भागातील रुग्ण संख्या, मृत्यू संख्या वाढ  तसेच लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. लस उपलब्धतेबाबत माहिती घेवून शहरी व ग्रामीण भागात विशेष लक्ष केंद्रीत करुन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे. यासाठी लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करुन लसीकरण मोहिम यशस्वी करण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्याचे सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. होम आयसोलेशनमधे असलेल्या व्यक्तीच्या हातावर शिक्के मारुन होमआसोलेशनच्या ठिकाणी स्टिकर लावून प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करावे.  नियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधिताना दिले.     कोरोना विषाणुचा रोखथांब करण्यासाठी आरटीपीसीआर व रॅपिड टेस्टचे प्रमाण वाढविण्याचेही सूचना यावेळी विभागीय आयुक्त यांनी दिले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ