ऑटोरिक्षा चालकांच्या कोविड चाचण्या

 


 अकोला,दि.२३ (जिमाका)- शहर वाहतुक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ऑटोरिक्षा चालकांच्या रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या फिरत्या स्वॅब संकलन केंद्रातर्फे स्वराज्य भवन परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ३२४ चाचण्या झाल्या त्यात सात जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली.

या उपक्रमास आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार,  पोलीस निरीक्षक वाहतुक गजान शेळके, मोटार वाहतुक निरीक्षक अमोल खेडकर, दत्तात्रय कदम तसेच पंकज वानखडे, मोहम्मद अतर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ