जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 



            अकोला,दि.20 (जिमाका)- जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु असुन 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक व 45 वर्षावरील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

            आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोविड लसीकरण आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांची उपस्थिती होती.

            नगरपालिका क्षेत्रात नगरिपरिषदेच्या मुख्यधिकारी यांनी नियोजन करुन शहरातील क्रोमाबिट व्यक्तीना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे तसेच ग्रामीण भागात सुक्ष्म नियोजन करुन गटविकास अधिकारी यांनी सर्व क्रोमाबिट व्यक्तीना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. लसीकरण कार्यक्रम येत्या 15 दिवसात पहिला डोस पुर्ण करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

            प्राथमिक आरोग्य केंद्रावर आशा सेविकाच्यामार्फत गावातील 45 वर्षावरील क्रोमाबिट लोकांची यादी तयार करुन त्यांना लसीकरण करण्यात यावे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्र सहाही दिवस सकाळी 10 ते लसीकरण होईपर्यंत सुरु ठेवावे. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसेवकाव्दारे जनजागृती करुन लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्यात.

शासकीय कर्मचाऱ्यांची कोविड चाचण्या आवश्यक

            शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या येत्या आठ दिवसात पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. तसेच ग्रामिणस्तरावर कोविड चाचण्या वाढविण्यात याव्यात. यासाठी जनजागृती करण्यात यावे. महानगरपालिका क्षेत्रातील चारही झोनमध्ये मोबाईल कोविड तपासणी व्हॅन फिरत असुन नागरिकांनी आपली कोविड तपासणी करुन  घ्याव्या, अशाही सूचना त्यांनी दिल्यात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ