शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवणक्षमता तपासून घरचेच बियाणे वापरावे


अकोला,दि.22 (जिमाका) जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी सोयाबीनची उगवन क्षमता तपासून घरचेच बियाणे वापरावे, असे आवाहन केले आहे. तथापी शेतकरी मोठ्याप्रमाणात सोयाबीन बियाणे बाजारातुन विकत घेऊन पेरत असतात. प्रत्यक्षात सोयाबीन स्वपरागिकरण असणारे पिक  आहे. त्यामुळे एकदा विकत घेतलेले प्रमाणीत बियाणे आपण सलग तीन वर्ष वापरु शकतो. दरवर्षी सोयाबीन बियाणे बाजारातुन घेण्याची आवश्यकता नाही.

            पिक उत्पादन खर्चात बियाण्यावर होणारा खर्चाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आपल्या विश्वासातील घरचे किंवा आपल्याजवळच्या शेतकऱ्यांचे उत्तम दर्जेदार घरचे सोयाबीन उगवण क्षमता चाचणी करुन बियाणे वापरावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ