छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सुचना जयंती साधेपणाने साजरे करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


 अकोला,दि.28 (जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथी नुसार) बुधवार दि. 31 रोजी  साजरा केला जाणार आहे.  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. या सुचनांचे पालन करुन नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अत्यंत साधेपणाणे साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

जयंती बाबत मार्गदर्शक सुचनाः-

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गढ़, किल्ल्यांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करावा, दरवर्षी शिवजयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण  करावे,  तसेच प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, त्याऐवजी छत्रपती विशवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पन करावे. सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझर या त्रिसूत्रीय नियामाचे पालन करून १०० व्यक्तीच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच कोरोना, मलेरिया, डेन्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) काटेकोरपणे पालन करावे, कोविङ-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ