रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 462 चाचण्यात 37 पॉझिटीव्ह


अकोला,दि. 8(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.7) दिवसभरात झालेल्या 462 चाचण्या झाल्या त्यात 37 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात तेल्हारा येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 252 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 107 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर बार्शीटाकळी येथे 39, अकोला आयएमए येथे 40, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 462 चाचण्यांमधून 37 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 42 हजार 235  चाचण्या झाल्या पैकी  3239  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ