निष्पादित व मुद्रांक भरलेल्या दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी गर्दी करु नये;आर्थिक वर्ष अखेर व कोरोनाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

  अकोला,दि.२६ (जिमाका)- खरेदी विक्री व्यवहारांच्या नोंदणीसाठी जे मुद्रांक शुल्क भरुन तसेच निष्पादित केलेले असतात, अशा दस्त ऐवजांचीनोंदणी  करण्यासाठी चार महिन्यांची मुदत असते, त्यामुळे ३१ मार्च आर्थिक वर्ष अखेरीस कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ नुसार खरेदी विक्री व्यवहारांच्या दस्तऐवजांवर शासन महसूल व वन विभागाच्या  दि.२९ ऑगस्ट २०२० च्या राजपत्रानुसार सवलतीच्या दराने लागू असलेल्या  मुद्रांक शुल्क दराची मुदत  दि.३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे. तथापि,  दि.३१ मार्च पर्यंत निष्पादित केलेल्या व मुद्रांक शुल्क भरलेल्या  दस्तऐवजाची नोंदणी चार महिन्यांच्या आत करता येथे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच कोविड १९ चा वाढता संसर्ग विचारात घेता नोंदणी विभागाच्या कार्यालयात अनावश्यक गर्दी करु नये. अनिवार्य कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतर कायम राखावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ