होळी, धुलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सुचना; सण साधेपणाने साजरे करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

  अकोला,दि.२६ (जिमाका)- रविवार दि.२८ मार्च ते  रविवार दि.४ एप्रिल या कालावधीत होळी, धुलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर संडे हे सण आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश या पुर्वीच जारी करण्यात आले आहेत. हे सण साजरे करण्याबाबत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. या सुचनांचे पालन करुन नागरिकांनी सण अत्यंत साधेपणाणे साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

होळी, धुलिवंदन, रंगपंचमी बाबत सुचनाः-

 कोणत्याही प्रकारे गर्दी न करता हा सण साजरा करावा. धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाणे साजरे करावे. काही ठिकाणी होळी शिमग्यानिमित्त मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी पालखी घरोघरी न नेता  मंदिरातच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, गर्दी होणार नाही याची काळजी घेत  दर्शनाची सोय करावी. कोणत्याही प्रकारे  धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नये.

 गुड फ्रायडे व इस्टर बाबत सुचनाः-

 दि. २८ मार्च ते दि.४ एप्रिल या होलि विक  दरम्यान प्रत्येक प्रार्थनासभेच्या वेळी  चर्च मध्ये उपलब्ध जागेनुसारच लोकांच्या उपस्थितीचे नियोजन करावे. जास्तीत जास्त ५० व किमान १० ते २५ लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. सामाजिक अंतर कायम राहिल याची खबरदारी घेऊन  आवश्यकतेनुसार चार ते पाच प्रार्थना सभांचे वेगवेगळ्या वेळी आयोजन करावे. प्रार्थनेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याची खबरदारी घ्यावी. चर्चच्या व्यवस्थापकांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करुन ध्यावी. या सणांनिमित्त दिले जाणारे संदेश  सोशल मिडीयातून प्रसारित करावे. चर्चच्या बाहेर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. मिरवणूका व गर्दी आकर्षित होईल असे कार्यक्रम आयोजित करु नये. स्थानिक प्रशासन तसेच पोलीस व  आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ