1124 अहवाल प्राप्त, 322 पॉझिटिव्ह, 423 डिस्चार्ज, तिघांचे मृत्यू


         अकोला,दि. 16 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1124 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 802 अहवाल निगेटीव्ह तर 322 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 423  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 22238(18395+3666+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 133022 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 130564 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2079  नमुने होते. आजपर्यंत एकूण 132851 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 114456 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

322 पॉझिटिव्ह

       आज सकाळी २१६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७६ महिला व १४० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कारला येथील १८, मोठी उमरी येथील १२, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी ११, खदान व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, गोपालखेड  येथील सहा, नकाक्षी, मलकापूर, सिंधी कॅम्प, खडकी, व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, शिवणी, आदर्श कॉलनी व बापू नगर येथील प्रत्येकी चार, दधम, देशमुख फैल, रजपूतपुराआळशी प्लॉट, जठारपेठ, राम नगर व पंचशील नगर येथील प्रत्येकी तीन, जीपी क्वॉटर, शास्त्री नगर, तेल्हारा, जूने शहर, अकोट, बजरंग चौक, केशव नगर, वाशिम बायपासहरिहर पेठतारफैल व संतोष नगर येथील प्रत्येकी दोनतर उर्वरित म्हैसांग, आखतवाडा, बोरगाव वऱ्हाडे, सोनाळा, हसणापूर, डोंगरगाव, व्हीएचबी कॉलनी, हाता, मोऱ्हळ, एमआयडीसी, कान्हेरी, रणपिसे नगर, पातूर, खिश्चन कॉलनी, पारस, व्याळा, अंबाशी, राहुल नगर, न्यु भीम नगर, गौतम नगर, आनंद नगर, किर्ती नगर, विद्युत कॉलनी, निमवाडी, हिंगणा रोड, रामदासपेठ, राधेनगर, श्रीराम टॉवर रोड, गंगाधर प्लॉट, खगारपुरा, माळीपुरा, तोष्णीवाल लेआऊट, पोळा चौक, दुबेवाडी, खेतान नगर, टॉवर चौक, शिवाजी नगर, जीडी ऑफीस, धामणी, वाडी अदमपुर, न्यु तापडीया नगर, सादीक नगर, रेपाडखेड, पंचगव्हाण, केळीवेळी, पिंपळखुटा, तामसी, अनिकट, काटीपाटी, माधव नगर, पिकेव्ही, बार्शीटाकळी, अशोक नगर, बाबुळगाव, राऊतवाडी, व महाजन प्लॉट येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी १०६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३७ महिला व ६९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील नऊ, मलकापूर व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, पातूर येथील सहा, लहान उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, शास्त्री नगर व कौलखेड येथील प्रत्येकी चार, हरिहर पेठ, कवठा शेलू व महाशब्दे हॉस्पीटल येथील प्रत्येकी तीन, राम नगर, मोठी उमरी, कोठारी वाटीकेच्या मागे, कोठारी वाटीका नं.२, जठारपेठ, गाडगे नगर, साई नगर, गिता नगर, महाकाली नगर येथील प्रत्येकी दोनतर उर्वरित महान, राजूरा सरोदे ता.मुर्तिजापूर, रणपिसे नगर, गोरक्षण रोड, न्यु तापडीया नगर, कंवर नगर, शरद नगर, रामदासपेठ, अकोट, राजंदा ता.बार्शिटाकळी, तोष्णीवाल लेआऊट, विद्युत कॉलनी, गायगाव, जूने शहर, कानशिवणी, सिव्हील लाईन, जवाहर नगर, जोगळेकर प्लॉट, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, पंचशील नगर, गुरुदेव नगर, रेल्वे गेट, जयरामसिंग प्लॉट, पंचवटी चौक, गणेश नगर, शिवसेना वसाहत, गायत्री नगर, अनंत नगर व भागोद्य नगर येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

        दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 69 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 216, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 106 तर रॅपिड चाचण्यात 69 असे एकूण 391 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

423 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, ओझोन हॉस्पीटल येथील  दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील पाच, कोविड केअर सेटर पास्टूल अकोट येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, बाईज हास्टेल, अकोला येथून १०, बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील ३३२ जणांना असे एकूण ४२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

तिघांचा मृत्यू

दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात मुर्तिजापूर येथील रहिवासी असलेली 60 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य खदान, अकोला येथील रहिवासी असलेली 46 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 2 रोजी दाखल करण्यात आले होते, तर सायंकाळी आदर्श कॉलनी, अकोला येथील रहिवासी असलेला 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. या रुग्णास दि. 11 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली

5061 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 22238(18395+3666+177) आहे. त्यातील 407 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 16770 आहे. तर सद्यस्थितीत 5061  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ