रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः २०१६ चाचण्यात १८८ पॉझिटीव्ह



          अकोला,दि. २७(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.२६) दिवसभरात झालेल्या २०१६ चाचण्या झाल्या त्यात १८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


          काल दिवसभरात अकोला येथे  सात चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे १२३ चाचण्या झाल्या त्यात २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे आठ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, पातूर येथे २२ चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  तेल्हारा येथे ५४ चाचण्या झाल्या त्यात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  मूर्तिजापूर येथे ४३ चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेतून १५८६  चाचण्या झाल्या त्यात ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,अकोला आयएमए येथे ७९ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ९३ चाचण्या झाल्या त्यात २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर बार्शीटाकली येथे एकाची चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण २०१६ चाचण्यात १८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ५८ हजार ८०८ चाचण्या झाल्या पैकी  ४७१६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ