412 अहवाल प्राप्त, 68 पॉझिटिव्ह, एक मयत

 


         अकोला,दि.29 (जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 412 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 344 अहवाल निगेटीव्ह तर 68  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

             त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 72  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 27340(22326+4837+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 154103 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 151499,  फेरतपासणीचे 379  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2225  नमुने होते. आजपर्यंत एकूण 153870 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 131544   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

68 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी ६८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३१ महिला व ३७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामदासपेठ येथील सात, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी पाच,  कौलखेड, वाशिम बायपास, मोठी उमरी, आसरामाता कॉलनी येथील प्रत्येकी तीन, राधाकिसन समोर, बार्शीटाकळी, वसंत टॉकीज, शास्त्री नगर, तापडीयानगर व तेल्हारा येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित जूने शहर, बाबुळगाव, हनुमान नगर, सिव्हील लाईन पोलिस स्टेशन, जामनेर, गोरक्षण रोड, नयागाव, आळसी प्लॉट, हिंगणारोड, येवलखेड, ज्योती नगर, खडकी, बाळापूर नाका, बिर्लाराम मंदिर, तळेगाव बाजार, शिवर, पंचशिल नगर, जीएमसी, सिंधी कॅम्प, राऊतवाडी, पातूर, वनीरंभापूर, बाळापूर, लहरिया नगर, सिंधखेड मोरेश्वर, बोरगाव मंजू व हरिहरपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

काल(दि.28) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 72 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 68, सायंकाळी प्राप्त अहवालात निरंक तर रॅपिड चाचण्यात 72 असे एकूण 140 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

  एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण लहान उमरी, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

6633 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 27340(22326+4837+177) आहे. त्यातील 447 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 20260 आहे. तर सद्यस्थितीत 6633 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ